दिंडी काव्य

Started by शिवाजी सांगळे, October 09, 2015, 08:31:53 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दिंडी काव्य...

वास्तव असो वा काल्पनिक   
नियमांत जरी मी बांधलेला,
चालतोय दिंडीत अविरत मी
काव्य ध्वज हाती घेतलेला!

वारकरी साहित्य पंढरीचे
थांबणे आम्हा ठावूक नाही,
देवु साथ अखंड साहित्याला
बागडता, चालता थकणे नाही!

काव्य ध्वज घेवोन हाती
चालवु सारे अखंड दिंडी,
सेवा माय बोली मराठीची
करण्या, देवो प्रेरणा दिंडी!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९