तुझी 'ती' सवय ,माझ' ते 'प्रेम

Started by तुषार भारती(अनामिक), October 11, 2015, 10:49:00 AM

Previous topic - Next topic
कवि :तुषार भारती..पुणे

( आपण एखद्यावर किती प्रेम करतो आणि त्याचीच किम्मत समोरचा कशी करतो याची तफावत मी या कवितेत मांडली आहे... प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतातच म्हणून दाद द्यायला विसरु नका)

######सवय ######

तिला सवय होती बदलायची ,मला प्रेमात आकंठ बुडायची
निपचित पडलेल्या ऋदयास हळूच फुंकर मारायची.......

तिला सवय होती स्वप्न दाखवायची ,मला मात्र ते डोळे बंद करुण पहायची,
कधीही तयार न होणाऱ्या नात्यात आंधळे पणाने जगायची.......

तिला सवय होती क्षण बदलायची, मला तेच क्षण ,क्षण-क्षण साठवायची....
निपचित पडलेल्या नात्याला नवे जीवन द्यायची

तिला सवय होती रंग बदलायची, मी मात्र रंगहिन होतो,
तिच्या रंगात मिसळण्यास जनु आधीन होतो
तिच्याच प्रेमात पूर्णपणे स्वाधीन होतो,

तिला सवय होती आकाशात सैरभैर उडायची, अन मला मात्र तिला उंच उड़ताना पहयाची
सांजवेळी पुनःशा घरटयात बसून तिची वाट पहायची

अखेर डाव तिने मांडला
चव चाखुन प्रेमाचा प्याला हां सांडला
तिने ओवलेल्या कच्या धाग्यात हा प्रेमाचा मोती अखेर जड़ जाहला
अन आज पुन्हा एक पाखरू पोरका जाहला

याघरटयास जिव्हाळा लाउन
सवयी प्रमाणे तिही दुसऱ्या फांदीवर गेली,
नव घर शोधन्यासाठी, पुन्हा एका पाखराला पोरकं करण्यासाठी...
पुन्हा एका पाखराला पोरकं करण्यासाठी-----


AmitRaj

खूप मस्त आहे कविता ... आवडली आपल्याला ...