चांदण मिठी

Started by शिवाजी सांगळे, October 12, 2015, 11:19:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चांदण मिठी

श्वास स्पर्श तुझा हवा हवासा
शुभ्र मोगरी विखुरल्या कळ्यांचा !

केतकी तव तनु हलकेच थरथरे 
दरवळ जीवघेणा ओल्या कुंतलाचा !

हळुवार तलम सळसळ वस्त्रांची
धुंद मधुर रवं तो कंकण, पैंजणाचा !

कल्पनातीत तु प्रिये कल्पनेतली
सैलावु नको चांदण भास मिठीचा !

श्वास स्पर्श तुझा हवा हवासा
शुभ्र मोगरी विखुरल्या कळ्यांचा !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९