फसवले मला मुंबईने

Started by तुषार भारती(अनामिक), October 13, 2015, 12:41:17 PM

Previous topic - Next topic
कवी:तुषार भारती अनामिक
::)
(माझी नवी कविता आजच्या प्रेमभावनेविषयी,
प्रेमाच्या मांडलेल्या बाजाराविषयी, अन मी मानलेल्या एका निरागस प्रेमाविषयी ...
टुटलेल्या हृदयांनी नक्की वाचा एका तुटलेल्या हृदयाची ही खरी कहानी....)

#####‪#‎कविता‬######

येऊ नको गड्या,इथे लई खेळ झाला.
पैसा अन पैस्या पायी माणूस बेईमान झाला.
माणसाला नाही किम्मत प्रेमाला नाही थारा
येऊ नको गड्या,इथे लई खेळ झाला.

मीही एकदा गेलो मुंबई या गावा
दादरच्या गर्दीत पुण्याचा उतरला हां छावा
भोळा साधा मुलगा प्रेमाचा भूकेला
फेसबुक वरच्या प्रेमाला भारीच भुललेला

गाली खळी घेऊन एकदाची ती ही आली..
तिच्या सोबत डबरी कोणीतरी आगावु भारी..
ओळख जाहली , नंतर मग लोकल ची स्वारी..
गेटवे-ताज समोर जाताच अजुनच खुलली याची ही सुंदर नारी....

दिवसेंदिवस सरत होते ,प्रेम तयांचे 'खुलत' होते
स्वप्नांच्या दुनियेत परीला घेऊन ते दोघे मस्त 'झुलत' होते....
पण माहीत नाही
स्वप्ननगरीत घडलेले हे भास होता की होते सारे खोटे....

रंगबदली गिरगिट होते एक ,पंख यौवनातच जणू नवे फुटलेले,...
शोध घेताच समजले सर्व थोड्याशा मोहापायीं कित्येक पाखरांचे पंख तिने असेच होते छाटलेले....

शेवटी याचाही पंख तिने असाच छाटला,
भरारी घेन्याआधीच संसार हा फाटला
डोळ्यात अश्रु, कंठ दाटुन आले,
आपल्याच पंखाकड़े पाहुन हे
पाखरू असे विव्हळत पडले.....

नवी भरारी घ्यायच ते कायमच विसरले
त्याच्या पवित्र प्रेमाला असे डावलले गेले.... फसला गेला हा प्रेमाच्या दुनियेत...
झाहली बेईमान ही मुंबई ,पुन्हा
पुण्याच्या नजरेत..-.

म्हणून सांगतो गड्या:-
मारुन तुझी इच्छा तुला हे बाजारात उतरवतील,
भाव येण्यासाठी तुला चांगली लेबल्स लावतील,
राहिलास मागे तर कोण तर त्याला सोडून हे दुसरीकडे उडून जातील......

येऊ नको गड्या,इथे लई खेळ झाला.
पैसा अन पैस्या पायी माणूस बेईमान झाला....

....╔══════════ ═
════════════╗
·•·.·´¯`·.•·
♫♪
·•·.·´¯`·.•·
╚════════════ ════════════╝
(¯`.´¯)
`•.¸•´
☻/..
/▌
.