मूकस्पंदने

Started by sachinikam, October 16, 2015, 06:07:54 PM

Previous topic - Next topic

sachinikam


मूकस्पंदने


काय केला गुन्हा की कुकर्म पूर्वजन्मीचे
सरेना हा भोग तोडू कशी ही बंधने
हिरावले स्वातंत्र्य कशी मूक झाली स्पंदने


शुष्क कंठ दाटलेला झरा अश्रूंचा आटलेला
खेळ नियतीने थाटलेला पतंग अस्मितेचा फाटलेला
घनदाट अंधार सभोवताली दाटलेला
उडणार कसा पक्षी पंख छाटलेला
उजळतो हिरा लाभता कांचनी कोंदणे
सांगू कुणाला कशी मूक झाली स्पंदने


दिशाहीन भरकटलेले निशादिन फरफटलेले
भडके उदरात भूकेचा जाळ
संपेल कधी असह्य कर्दनकाळ
जाण्यायेण्याने जगात का होई विटाळ
पैलतीरा जाऊ कसे खोल पाणी गढूळ गाळ
ये धावुनी मदतील देवा करतो शतकोटी वंदने
हाका तरी मारू किती कशी मूक झाली स्पंदने
--------------------------------------
कवितासंग्रह: मुग्धमन
कवी: सचिन निकम
संपर्क: ९८९००१६८२५, पुणे
---------------------------------------