झाले काल काही

Started by शिवाजी सांगळे, October 17, 2015, 12:09:09 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

झाले काल काही

नाते सुखाशी कधी, कसे जुळलचे नाही,
साथ मैत्रीचा दुःखांनी, त्या सोडला नाही!

साक्ष दिल्या दु:खांची, देण्यास कोण आहे?
जल्लोष मज सुखाचा,दवंडीत घुमतो आहे!

निसटते ओंजळ वाळू, कोणास ठाव आहे? 
सुर्यास्त इथे नित्याचा, किनारा एकटा आहे!

झाले काल काही, सारे ते विरूनी गेले,
सांजवेळी का असे, पुन्हा आठवुन आले?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९