जगण्याची किंमत...

Started by Rajesh khakre, October 20, 2015, 03:36:30 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

भावना इथल्या दडपल्या जातात
परिस्थितिच्या ओझ्याखाली
जगण्याचे नियम इथे कधी
जगण्यालाही मारतात जीवंतपणी
मनाचे रुदन अविरत तरी
कुणा सूतक नाही त्याचे
मरणारे मरतील रोजच
रोज रोज कोण रडणार
तु मेलास की मग मात्र
तुझे मढे नक्की गाडणार
जिवंतपणी जेवढा दबला
त्यापेक्षा कमीच त्रास होईल
आणि असाही मेल्यावर
कुठे जीव राहतो शरीरात
तसेच रोज मरताहेत ना रोज
परिस्थितिच्या ओझ्याखाली
जगण्याच्या कठोर नियामाखाली
आणि भाऊ मेला तरी वाईट नको समजू
तु ह्या चाकोरीतूनच चालला पाहिजे
उगीच पाय फुटेल तसा जाशील तर
हे जग तुला माफ़ नाही करणार
कारण तुझ्याकडे तु योग्य आहेस
एवढे कागदोपत्री पुरावे आहेत का
इथे भावना नाही पुरावा बोलतो
इथे वास्तव नाही विधी बोलते
जगण्याची किंमत कधी इथे
मरुन सुद्धा फेडावी लागते
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com