टाटा मेमोरिअल कॅन्सर सेंटर ...

Started by विक्रांत, October 20, 2015, 10:25:30 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


वेदनांच्या महालात
आर्त बोल डोळीयात
किती किती आणखीन
काय नसे यास अंत

जगण्याचा शाप होता
मरणाच्या सावलीत
क्षण क्षण भार होता
व्यतिलेला नरकात

का मलाच पुसावी ही
व्यर्थ होती यातायात
कीड लागे कुण्या फळा
वृक्ष वेली नसे ज्ञात

काही नवी काही जुनी
दवा दारू पदरात
मंत्र तंत्र देव संत
बांधलेली ताइतात

जगण्याचा लोभ क्षोभ
दाटलेला काळजात
आणि व्यथा नकोशी ती
देहा संगे घेवू जात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/