तू नसताना आठवणींचे झुले झुलताना पाहिले!!

Started by sameer3971, October 21, 2015, 01:18:31 PM

Previous topic - Next topic

sameer3971

ती नसताना आठवणींचे
झुले झुलताना पाहिले
गीत माझे शब्दांविन
सूर शोधतांना पाहिले

कालचे ते चित्र होते
की होते ते स्वप्न माझे
त्यात उनाचे कवडसे
खेळताना मी पाहिले.

नुसतेच न्हवते हासने ते,
नुसतीच न्हवति ती अदा
गुलाबी पाकळ्यांना गालतच
लाजताना मी पाहिले.

पापण्या त्या झूकालेल्या होत्या
की बंद ते होते डोळे
काही तरी शोधण्याची ओढ
डोळ्यातून ओसांडलेली मी पाहिले.

अधीर आहे मी इथे अन्
अधीर तुला मी पाहिले
अधीर श्वासात ह्या तुझे
श्वास गुंफलेले पाहिले

तू नसताना आठवणींचे
झुले झुलताना पाहिले
हवास प्रिया तू जवळी असा
लोचने सांगताना मी पाहिले.

समीर बापट
मालाड, मुंबई.

AMIT GAIKAR

CLASS

अधीर आहे मी इथे अन्
अधीर तुला मी पाहिले
अधीर श्वासात ह्या तुझे
श्वास गुंफलेले पाहिले