मातीचेच इमले होते

Started by sameer3971, October 21, 2015, 03:19:10 PM

Previous topic - Next topic

sameer3971

मातीचेच इमले होते
मातीचेच होते रस्ते
मातीचाच मीही आहे
मातीत मिसळायचे सारे

कधी झुंज वादळाची होती
कधी वावटळ पिंगीत होते
कधी धुराळे उठले होते
कधी घर उजाड झाले सारे

पाण्याचाच समुद्र रुद्र
पाण्याचीच सरिता अशांत
पाण्यातलेच भोवरे होते
पाण्याचेच अश्रू वाहीले सारे

संघर्ष जीवनाचा मोठा
संघर्ष आयुष्याचा होता
संघर्षा शिवाय जीवन न्हवते
संघर्षात मग मरणे सारे

समीर बापट
मालाड, मुंबई.

21st Oct 2015.