विजयादशमी

Started by Pravin Raghunath Kale, October 22, 2015, 11:20:28 AM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

विजयादशमी

आधुनिकतेबरोबर संस्कृतीचा
उत्सवरूपी मेळ
आनंदरूपी ठेव्याचा
दांडीयाचा खेळ

रामाने रावणाचा
केलेला पाडाव
सोबतीला नेहमीचा
शुभेच्छाचा वर्षाव

आपट्यांच्या पानांचा
सुवर्णरूपी सार
झेंडूच्या फुलांनी
सजवलेलं व्दार

नवरात्रीच्या नवरंगानंतर
आनंदाची दशमी
स्वीकारा शुभेच्छा
या विजयादशमी...
       ~प्रविण.
----×----×----
प्रविण रघुनाथ काळे
मो. 8308793007
Www.facebook.com/kalepravinr
http://pravinkalemy.blogspot.in