पैसे खाणारे

Started by विक्रांत, October 22, 2015, 10:44:50 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



लोक का पैसे खातात
पाणी गटार पितात 
मारूनी सारे आवाज   
घाणी पोट भरतात

मानती देह सुखास
मोजती सुख पैशात   
खेळ चार दशकाचा
पाप विकत घेतात

घेणे सारे देणे आहे
ऐश्या बोला हसतात 
अन विषारी फुलांनी
घर सारे भरतात     

फडफडाट नोटांचा
धुंदी आणतो मनात   
पाप भरते प्रारब्धी 
त्या नाही ते म्हणतात

साप डसता का कुणी
लगेच असे मरतात
घटिका काही जातात
मग प्राण ये कंठात

धन सारे कुबेराचे
चूक नसे हिशोबात
पै पै फेडणे पुढती
का नच ध्यानी घेतात 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/