*** छोटीशी भेट ***

Started by धनराज होवाळ, October 24, 2015, 09:01:51 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


💑 ❤ छोटीशी भेट ❤ 💑

केव्हा पासुन तुला काॅल करतोय,
पण तुझा फोन लागतच नाहीये..
खरं सांगायचं तर तेव्हापासुन ना,
माझ्या जीवातच जीव नाहीये..!!

तु यायचं म्हणतेस पण,
तुझं येणं ही होत नाही..
मी भेटायचं म्हंटलं तरी,
तुझं भेटणं ही होत नाही..!!

माझ्या प्रत्येक नजरेत,
समोर मला फक्त तुच दिसते..
म्हणुनच तर माझं हे मन,
अगदी वेड्यासारखे हसते..!!

तुझी भेट जर झालीच कधी,
तर ती असते एका क्षणाची..
वेडी किती परीक्षा घेशील,
माझ्या या वेड्या मनाची..!!

तु सोबतीस असलीस की,
मला ना काहीच कळत नाही..
मी फक्त तुला पाहत राहतो,
नजर दुसरीकडे वळत नाही..!!

तुझ्या छोट्याशा भेटीत पण,
माझं आयुष्याचं सुख आहे...
अन् तुझ्या हृदयाच्या रानात,
माझं जन्मभराचं पिक आहे...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
(धनराज होवाळ)
पलुस, जि. सांगली
मो. ९९७०६७९९४९
❤❤❤❤❤❤❤❤❤


धनराज होवाळ


aspradhan