nvin aakash

Started by sulabhasabnis@gmail.com, October 24, 2015, 05:20:00 PM

Previous topic - Next topic

sulabhasabnis@gmail.com

     नवीन आकाश
भरून आलेले आभाळ तेच आहे अजून

पाऊस पाडून मोकळे होणे तसेच अजून
मेघमालेचे गडगडणेअजून तसेच आहे
धरतीचे आसुसणे पण तसेच तर आहे
उष:कालचे आकाश अजून उजळते आहे
सांजरंगांचे गारूडही मोह घालतेच आहे
हिरवी हिरवी राई अजूनही तरारलेली
वृक्षवेली फुलाफळांनी तशीच बहरलेली
खट्याळ वाराही तसाच वाहतो अजून

पुष्पगंधही पसरवतो दिशांदिशांतून
तोच चंद्र तेच तारे तोच गंध तेच वारे
फुलपाखरे तीच अन् पक्षी गोड गाणारे

मग मीच का अशी बदललेली-----
काहीतरी हरवलयाचा भास आहे
ते गवसण्यासाठीची आस आहे
उरी दरवळणारा गंधकोश आहे
तरीही घुसमटणारा श्वास आहे
जिवाचे थकले पाखरू भरकटते आहे
तरीही नवीन आकाश शोधतेच आहे
            -------------

suraj choudhari

tumchi kavita khupch zakkas aahe.......!

sulabha sabnis


sulabha sabnis