सत्य

Started by Ravi kamble, October 26, 2015, 05:23:30 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

सत्य...

आज ही माणूस धर्मात वाटला गेला आहे
रक्त साऱ्यांचे लाल तरी बाटला गेला आहे

कोणी मारले दगड ना कुणास घेणे आहे
उघड्याच डोळ्याने जो तो झोपला गेला आहे

तीन माकडांचे फक्त जगणे उरले आहे
पुरोगामीला बंदुकिने ठोकला गेला आहे

शेतकऱ्यांच्या नशीबी अजुन दोरीच आहे
भ्रष्टाचारांने बाजारसाठा साठला गेला आहे

लोक चळवळीचा लढा सध्या आटला आहे
आपआपसात भांडून पेटला गेला आहे

थरथरती हात तरी मी आज लिहतो आहे
सत्य सांगणाऱ्याला इथे मारला गेला आहे
×××××××××××××××××××××××××××××××
स्वलिखित:-रविंद्र कांबळे पुणे 9970291212