पतिव्रता

Started by madhura, October 27, 2015, 01:45:15 AM

Previous topic - Next topic

madhura

ती अचानक दिसली काल रस्त्यात
उंची साडी ,पर्स ,अगदी चप्पल सुद्धा
खूप काही कानावर यायचं तिच्याबद्दल
पण न राहवून मी थांबलेच
तीही थांबली
तिच्या मंगळसुत्राच्या जागी
हिऱ्यांचा नेकलेस
तिला माझ्या नजरेतला प्रश्न कळला
ती निर्विकारपणे म्हणाली
हल्ली नाही घालत
व्यवहार सोपे होतात त्यामुळे
अग! तुला आश्चर्य वाटण सहाजिक आहे
माझ्यासारखी साधी सरळ मुलगी
अशी कशी ?
स्त्रिया पतीच्या निधनानंतरही जपून
ठेवतात त्याच्या अस्तित्वाच्या खुणा
स्वसंरक्षणार्थ किंवा त्याची आठवण
म्हणून .पण ! माझ्यासाठी ही
सौभाग्याची लेणी म्हणजे अडसर....
नव-यानेच उतरविले हे
गिर्हाईक येत नाही म्हणून .....
त्याच्या पोटाची खळगी ,आणि चैन पुरवण्यासाठी

आता मी फक्त पैसे मिळविण्याच साधन
पूर्वी नवर्याच्या निधनानंतर सती जायच्या ना ग स्त्रिया?
पण! मी तर जिवंतपणीच
सती गेले ना ?
मग ! पतिव्रता कोण ?
या तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायची हिम्मत
नव्हती माझ्यात .......

सौ .ज्योत्स्ना राजपूत
पनवेल .

कवी - गणेश साळुंखे