देव पावला

Started by PRAFULL VIJAY MAHAJAN, October 27, 2015, 09:33:51 PM

Previous topic - Next topic

PRAFULL VIJAY MAHAJAN

नाही हात जोडले, नाही फुले वाहिली
नाही कुंभस्नान केले, नाही पापे आठवली
तरी देव पावला...
नाही साकडे घातले, नाही नवस घातला
नाही लोटांगण घातले, नाही अभिषेक केला
तरी देव पावला
लोकांनी सांगितलेला देव नाही जागा झाला
पण माझा देव जागा झाला आणि पावला
कधी तो कीटकाच्या रुपात, तर कधी तो प्राण्यांच्या रुपात
कधी तो मनुष्याच्या रुपात, तर कधी पक्ष्याच्या रुपात
मला प्रत्येक ठिकाणी त्याची चाहूल लागली, कारण त्याला मी पहिले माझ्यात,
नाही मी कोणती अपेक्षा धरली, नाही मी कोणता मोह धरला
तरीच देव मला पावला...
लोकांनी देवाची बनवली वेगवेगळी रूपे
पण माझ्या देवाची सगळीच रूपे
नाही  कुठे जावे लागले, नाही कुठे रांगेत लागलो,
माझा देव नेहमीच माझ्या जवळ राहतो
जेव्हा कुणाचा राग धरला, जेव्हा अहंपणा जागा झाला
माझ्या देवाने माझी चूक दाखवली मला,
कधी अनुभवातून तर कधी पश्चातापातून
देव नेहमी सोबत आहे, जो पर्यंत माणूस म्हणून जगत आहे...