भाडखाऊ भडव्यानो शेतकऱ्याची माय आहे रडते

Started by Maha Ravindassa, October 27, 2015, 09:42:49 PM

Previous topic - Next topic

Maha Ravindassa


कोणाला कुणाचे आणि सरकार मिडिया ला या इंद्रायणीचे
राज्यात तीन दिवसात चाळीस जीव गेले रे बळीराजाचे
पुढाऱ्यांच्या शाही पार्टी दिमाखात चालते
अरे भाडखाऊ भडव्यानो शेतकऱ्याची माय आहे रडते ।। धृ ।।
कुणाला गायीचे तर कोणाला देवाचे
शहरी पिलावलीना सारे दिवसच आनंदाचे
शेतात पाणी नाही पाण्याला पाउस नाही
पडतोय पाऊस मात्र बळीराजाचा जीवच नाही
अंधाऱ्या रात्रीत शेतकऱ्या चे मढे पडते
अरे भाडखाऊ भडव्यानो शेतकऱ्याची माय आहे रडते ।। १ ।।
धर्माचा तुमच्या लय मोठा गाजावाजा
कोडमडून गेलाय आमचा बळीराजा
तुमच्या सरकार चा देवाकडे धावा
पाण्यावाचून मारतोय उभा महाराष्ट्र हाच आमचा सांगावा
गाय हिदेखील पाण्यावाचून आहे मरते
अरे भाडखाऊ भडव्यानो शेतकऱ्याची माय आहे रडते ।। २ ।।
उभ्या जवानीत देव धरणीवर ठेवला तेव्हा कोणी नाही आले
पण मेल्यावर माझ्या मरणाचे राजकारण करण्यास सारेच जमले हे कावळे
आमच्या मरणाचा मिडिया मध्ये नुसताच गाजावाजा
आत्महत्या करण्यास सरकारच पाठिंबा देतोय समजून घेरे बळीराजा
शेतीला तुझ्या काडीची हि किंमत नसते
अरे भाडखाऊ भडव्यानो शेतकऱ्याची माय आहे रडते ।। ३ ।।
आता म्हणती नका पिकवू शेतात धान्य पेट्रोल डीझेल काढा रे
कधी समजणार या भारताला जेवण्यासाठी धान्यच लागते रे
माणूस म्हणून आमच्या कडे एकदा तरी पहा रे
जीव आमचा तुमच्याच वाणी आहे एकदा समजून घ्या रे
आमच्या जीवाचा असा खेळ नका करू आमचे जीवन व्यर्थ आहे ठरते
अरे भाडखाऊ भडव्यानो शेतकऱ्याची माय आहे रडते ।। ४ ।।

रविंद्र सावंत

Kiran Patil

सर कविता खूप छान आहे .. अजू काही दिवस वर्ष थांबा याच ओळी शेतकरी राजा या राज्यकरत्याच्या गळ्यात फासलावू म्हणेल

Anil pise