१} मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही

Started by Maha Ravindassa, October 27, 2015, 09:44:40 PM

Previous topic - Next topic

Maha Ravindassa


२२ प्रतिज्ञा
१} मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही


कसा ठेवू विश्वास सांगा या तीन काल्पनिक देवावर
वर्षानुवर्षे गुलामीच साहिली नुसताच अन्याय आमच्यावर
म्हणून शपथ आज ला घेतो आहे झुकणार यांच्यापुढे नाही
म्हणून मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव  मानणार नाही ।। धृ ।।
ब्रह्मा कसा सृष्टीचा निर्माता होईल हि तर  निसर्गाची किमया सारी
परिवर्तन हा नियम सृष्टीचा बुद्धाचे तत्वज्ञान सांगते तरी
ब्रह्माला बसवून आमच्या मानेवर ब्राह्मणा तुझी लबाडी लय भारी
तीन डोक्याच्या ब्रह्माला  मेंदू होता का नव्हता  हि गोष्टच नाही खरी
माणूस कधी कोणाच्या मुखातून  जन्मच घेत नाही
म्हणून मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव  मानणार नाही   ।। १ ।।
आमचा जन्म ब्रह्माच्या पायातून शुद्र म्हणून संबोधले
ब्रह्माचा जन्म कोठून झाला हे का नाही सांगितले
निसर्गाच्या कृतीला यांनी ब्रह्माचे नाव देवून टाकले
कशातून सृष्टी  निर्माण केली हे अजून नाही कळाले 
तरी देखील  आम्हाला खरे काही अजून समजत नाही
म्हणून मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव  मानणार नाही   ।। २ ।।
विष्णूची कमाल भारी समृद्रात  करी निवास
अवतार घेवून घेवून याची यालाच राहिली नाही ओळख  हि खास
जनावराचे अवतार घेतले याला वासनेची फक्त आस
अनेक अवतारात यांच्या कथा मात्र रंगेल झकास
पालनकर्ता विष्णू जगाचा जगात याला कोणी ओळखत नाही
म्हणून मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव  मानणार नाही ।। ३ ।।
कालाप्निक सारे काही यांना कोणताच  नाही आधार
समुद्रातून पृथ्वीला बाहेर काढले असा हा वराह अवतार
मूर्खपणाची येते कीव  ज्यांचा विश्वास असल्या कथांवर
या मुर्खांना कोण सांगणार अरे समुद्रच आहे ना पृथ्वीवर
तरी देखील मेंदूची यांच्या कवाडे  उघडतच नाही
म्हणून मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव  मानणार नाही  ।। ४ ।।
शंकराची  तर कथाच भारी  विनाश करण्यासाठी हा देव उभा केला
नागवंशी राजाचा इतिहास विकृत करून तुमच्या पुढे हा आला
जाणून घ्या रे शंकर नाही देव इथे तो राजा आहे रे आपला
करून हत्या त्याची यांनी भोला सांब तुम्हा दावला
तरी देखील शंकर काही तुमचा आमचा नाही
म्हणून मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव  मानणार नाही  ।। ५ ।।
अंधभक्ती हि विनाश आहे विनाशाचा उद्गाता निसर्ग आहे
उघड्या डोळ्यांनी बघा निसर्गाच्या शक्तीला शंकर करून दावले आहे
यांच्या शक्तीला कुठेच कमरता नाही पण शत्रू  यांच्यावर भारी आहे
राक्षस लोकांना देवून वर आपल्यावर संकट ओढवणार मुख देव आहे
यांच्या मुर्खतेला कुठेच तोड नाही
म्हणून मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव  मानणार नाही ।। ६ ।।
नागपूरच्या मातीत बाबासाहेब सांगून गेले आम्हाला
ब्रह्मा विष्णू महेश यांना द्यावे फेकून हित आहे तुमच्या जगण्याला
यांच्या नादाने केवळ विनाश आजवर झाला आपला
बुद्धाच्या मार्गाने चला उत्कर्ष होईल नवजीवन या मानवाला
शिक्षित झालो ना आता यांची पूजा काय आम्हाला करायची नाही
म्हणून मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव  मानणार नाही ।। ७ ।।


भीमरत्न सावंत

Nandkishor Kawale

लिखाण स्वातंत्र्याचा दुरूपयोग म्हणतात तो असा. कीव येते तुझ्या विचारांची. प्रभू तुला सद्बुद्धी देवो.

Rahul deshpande


Maha Ravindassa

तुमच्या प्रमाणपत्रांची मला गरज नाही आणि तसे हि तुम्हाला मी आमंत्रण दिले नाही कि यावर रिप्लाय द्या म्हणून बाबासाहेब यांनी ह्या आम्हाला १९५६ ला दिलेल्या प्रतिज्ञा आहेत त्या मी कवितेतून सांगितल्या याचे खूप मोठे विश्लेषण हि मी करू शकतो बरे का महोदय

Maha Ravindassa


Nandkishor Kawale मी माझ्या लिखाण स्वातंत्र्याचा उपयोगी योग्य करतो आहे असेल हिम्मत तर या देवांचे अस्तित्वाचे दाखले दे  उगाच व्यर्थ बडबड करू नका