माझा नवरा

Started by madhura, October 28, 2015, 02:20:58 PM

Previous topic - Next topic

madhura

Mazha Navra is an excellent comedy poem and i loved it. Hence I am sharing it here.

कशा कशावर गझला करतो,माझा नवरा
मी,मुलगी,दुनियेस विसरतो,माझा नवरा


समजत नाही इतक्या गझला अगम्य याच्या
टिका करावी,तर्......भिरभिरतो,माझा नवरा


दुज्या सांगतो,पथ्य्,बंधने खाण्यावरची
सामिष दिसता,यथेच्छ चरतो,माझा नवरा


''फिरावयाला न्यावे'' म्हटले,तोंड फिरवतो
तीन लोक गझलेत विहरतो,माझा नवरा


व्यायामाचे महत्त्व त्याला ज्ञात असे पण,
सदा-कदा खातो नि पसरतो,माझा नवरा


असते मी बिनघोर ''सुजाता'' त्याच्या संगे
हळव्या शब्दांनी पाझरतो,माझा नवरा


--सुजाता कैलास गायकवाड



shankarghodekar


pandit warade