तू नाही, तू दिलेल्या आठवणी जास्तं त्रास देतात, -------------अमित जयवंत गायकर

Started by AMIT GAIKAR, October 28, 2015, 07:23:20 PM

Previous topic - Next topic

AMIT GAIKAR

एकांतांत सतवतात,
मनी वेदना देऊन जातात,
तू नाही,
तू दिलेल्या आठवणी जास्तं त्रास देतात,

मंद वारा जणू,
भावनांना हुल्कावतात,
तुझ्या ओढी चा गंध,
माझ्या परी पोहोचवतात,
तरी तू  न सोबतीला,
होय
तू नाही,
तू दिलेल्या आठवणी जास्तं त्रास देतात,

डोळे हे तुला शोधतात,
नाही नजरेस तू,
तू आहेस असे भासवतात,
तू नाहीस हेच खरं,
हे विचार माझे मलाच डसतात,
तू नाही,
तू दिलेल्या आठवणी जास्तं त्रास देतात,

                         -------------अमित जयवंत गायकर



AMIT GAIKAR

Thanks Ms Radha. Its really an Honour to receive a compliment for my poem from you. खूप बरं वाटत जेव्हा आपण लिहितो आणि त्या साठी  compliments भेटतात . Thanks once again.

paripriya

sundar lihilay ... :) तू नाही,
तू दिलेल्या आठवणी जास्तं त्रास देतात,