चंद्र आणि तु

Started by jaydeshmukh2@gmail.com, October 28, 2015, 10:42:06 PM

Previous topic - Next topic

jaydeshmukh2@gmail.com

काल चंद्र भेटला होता,
तुझ्याबद्दल पुसत होता,
मी आठवणीत की साठवणीत?
असं बोलुन हसत होता,

चेहर्यावरचे भाव पाहुन माझ्या
तो अडचणीत  पडला,
माझ्यासारखा डाग नको तुझा चंद्रावर
असं म्हणुन तो रडला

सरीरूपी नभातुन तो तुझासाठी बरसत होता,
तुझासाठी तो पाउस ,पण माझ्यावर तो गरजत होता,

आपल्या दुराव्याचं दुःख जाणुन मी नकळत परका झालोय,
तुला खुष ठेवीन असं वचन मी त्या चंद्राला देवुन आलोय



कवी
संदेश घारे,विक्रोळी,मुंबई