भास आभास

Started by शिवाजी सांगळे, October 29, 2015, 06:49:14 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भास आभास

कसा भास हा अवचित मनाला मनाचा
दरवळ गंध जसा पहिल्या पावसाचा,
तुझ्या आठवांचा क्षण चांदण पावलांचा
क्षणेक झाला भास मनाला मोहरल्याचा !

मोहक स्पर्शकंप मयुरपंखी त्या सुखाचा
पाझरे सुख सुखासवे संकेत हा कशाचा?
हलकेच मज उमजला अर्थ जीवनाचा
क्षणेक झाला भास मनाला मोहरल्याचा !

©शवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९