नोकरदार

Started by nileshjoshi5, October 29, 2015, 11:17:19 AM

Previous topic - Next topic

nileshjoshi5

~ नोकरदार ~

मी एक नोकरदार
कामावरची श्रद्धा फार
नोकरीवर पोटाचा भार
मी एक नोकरदार

माझ्या व्यथा ही अपरंपार
कारण कामाच्या वेला फार
कधी सकाल अन कधी संध्याकाल
रात्रीलाही करावे लागते काम
मी एक नोकरदार

मला नाही एक मालक
फार आहेत माझे चालक
त्यांच्या मनात नाही सख्य
मला करुनी टाकतात थक्क
मी एक नोकरदार

काय सांगू अधिकार् यांचा तौरामोरा
कोणी करतो शाब्दीक मारा
नोकर कुणाचा चमचा न्यारा
पण अधिकारी माझा प्यारा
मी एक नोकरदार

संपताच कार्यालयाचा काटा
मी धरतो घराच्या वाटा
उघडताच घराचे दार
सुरू होतो बायकोचा भडीमार
मी एक नोकरदार

घरी पण नाही चैन
सदा मी राहतो बेचैन
नात्यांशी नको वादावादी
बरे माझे चौकातील साथी
मी एक नोकरदार

माझा पगारही आहे अल्प
सोबती सुखी संसाराचा संकल्प
पगार होतो मासात
सर्व खर्च होतो सप्ताहात
मी एक नोकरदार

सुरू आहे असा गाडा
पाठ होतोय पाढा
वाहुनी सेवापुष्प
करुया आनंदी आयुष्य
मी एक नोकरदार

-  ©®  निलेश ल.जोशी
                       रिसोड