भेदभाव

Started by nileshjoshi5, October 29, 2015, 02:59:25 PM

Previous topic - Next topic

nileshjoshi5

                    ~भेदभाव~

सहज सुंदर माझे हे मन
असह्य सोसत जगाचे व्रण
घालवी राञ अन् दिवस मास
निष्ठुर कसं हे समाज मन

भेदभावांचे करते वारांवर वार
खोलवरते जाते जखम अपार
ओलेचिंब करते रक्ताची धार
त्याला शञुंचे मिठ फार

जखम खोल भरायची नाही
रक्त लाल थांबायचे नाही
बघुन घ्या हो तुमचे नी माझे
लाल हे रंग बहुजनाचे

कोणी नोकर कोणी मालक सर्व बाळ देवाचे
देव हा कोण, निसर्ग भारी
त्याने दिली दौलत न्यारी
हिरवी झाडे अन् पशु ही सारी

भांडतो का आपण मारुनी त्यांना
ती सर्व आपुल्या कामाची
देवाचे प्रकार बणवते कोण
आपले हे निष्ठुर मी पण

माणुस एक
प्रकार अनेक
सावली काळी, राहणी निराळी
समस्या का ही जाहली?

देऊनी भेदभावाला खो
चला एक होऊया दो
होईल जगाचे मंगल
करुनी ञिवेणी संगम

   -©R निलेश ल. जोशी
             रिसोड