पडले आहे

Started by Ravi kamble, October 30, 2015, 09:58:52 AM

Previous topic - Next topic

Ravi kamble

देश हितासाठी ज्यांनी संविधान तयार केले
एकाच जाती धर्मात अडकून पडले आहे..!

पुरोगामीचा लढा ज्यांनी जीवंत ठेवले होते
मारिले कोणी पुरोगामीस प्रश्न पडले आहे..!

साधू संताचा हा देश जगास मिरवुन सांगे
कुकर्माने आज सारे तुरुंगात पडले आहे..!

बळीराजाच्या स्वराज्याचं ज्यांनी स्वप्न दाखविले
भ्रष्टाचाराने ते राज्य दुष्काळात पडले आहे..!

सत्य अत्याची बाजू कोणी समजुन घेईना
जीवंत पणात माणसे मुर्दाडात पडले आहे..!

नात्यांना दगा देवुनी किती कमविले रे कोणी
सरकारी शवागृही एकटेच पडले आहे..!
×××××××××××××××××××××××××××××
स्वलिखित:-रविंद्र कांबळे पुणे 9970291212