* प्रेमवीर *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 02, 2015, 07:10:54 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


आठवणींचे युध्द चालते
माझ्या मनपटलावर
सुख दुःखाचे सैन्य
उभे ठाकते एकमेकांसमोर
विचारांचे घोडे सैरभैर
संशयाचे हत्ती अनावर
भावनांचे पायदळ रणांगणावर
धोक्याचे बाण ह्रदयावर
रुतुन बसला रथ मायेत
तरीही लढतो मी प्रेमवीर.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938