हे ही प्रेम?

Started by madhura, November 02, 2015, 07:43:39 PM

Previous topic - Next topic

madhura


पावसाळ्यात तात्पुरते
वाहणारे ओहोळ
स्वतःच नदी असण्याची
प्रौढी मिरवणारे
आणि त्यांचे अदृश्य किनारे
त्यांच्या महान असण्याचा
साक्षात्कारी दंभ
उन्मत खिजवत फिरणारे


तसंच असतं की काय
कुणाच कुणावर प्रेम
उथळ क्षणीक तरी
जन्मांतरीचं भासणारं ?


एकमेकांच्या ' खास' असणारऱ्या
नात्यांचे सारे परीघ स्पर्शूनही
गवताच्या काडीचही ओझं होऊन
कोसळून पडणारं


उठलेला एखादा तरंग
भावनातिरेकाचा शहरा
सुखदुःखाचा अश्रू
असे अल्पायुषी सुखद काही
हे ही प्रेम?


भावनांचं जाळं विणून
कडे कापऱ्यानां टक्कर देत
जिवाशिवाची गुंतागुंत
जगण्याच्या अंतापर्यंत नेणं
हे ही प्रेम?


- माधुरी गयावळ