लाटेचे प्रेम

Started by shardul, November 03, 2015, 06:03:21 PM

Previous topic - Next topic

shardul


सागराची लाट अशी का
किनाऱ्यावर आदळते,
शांत चित्ताने मग जणू
सागराकडे पुन्हा वळते .


किनाऱ्याची ओढ तरी
सागरातच खरी समरसते,
माहेरास ये दोन घडी
सासरातच जरी ती रमते .


किनारा भासे मातेसम
उधाणास मग ये भरती,
चन्द्रदर्शनाने संकोचून
ती लपे सागराच्या पोटी .


आत-बाहेर, येते-जाते
लाटेचे कोणाशी खरे नाते?
धरतीवर ती प्रेम करते
कि सागरासवे निभावते?


चंद्र-सूर्याच्या स्थानावरती
निश्चित होते ओहोटी-भरती,
अविश्वास नको हो प्रेमावर
त्सुनामी गिळेल ना धरती .


स्मिता साळवी

कवी - गणेश साळुंखे