चित्र

Started by shardul, November 03, 2015, 06:05:10 PM

Previous topic - Next topic

shardul


तीच सफरचंदे , तोच जग ... पाण्याचा
तीच झाडे , तोच ढग
पण चित्रांत मात्र तो असतो ... फक्त सेझांचा


तीच शेते , तेच मजूर ... खाणीतले
तेच वृक्ष, तेच तारे
पण चित्रांत मात्र ते बनतात ... फक्त व्हान गॉघचे


तीच माणसे, तेच पेच ... गुंतागुंतीचे
तीच बकरी, बैलही तेच
पण चित्रांत मात्र ते होतात ... फक्त पिकासोचे


त्याच स्त्रिया , तेच घोडे ... सूर्याचे
तेच कंदील , तेच जोडे
पण चित्रांत मात्र ते उरतात ... फक्त हुसेनचे


तेच रंग , तेच फिरणे ... रोलरचे
तेच पोत, तेच पाहाणे
पण चित्रांतील नि:शब्द गूढ मात्र असते ... फक्त 'गाय' चे


- सतीश डिंगणकर