AWESOME: MUST READ: नव्याने प्रेमात पडलेल्या एका अल्लड प्रेमिकेचे मन

Started by shardul, November 03, 2015, 06:09:29 PM

Previous topic - Next topic

shardul



नव्याने प्रेमात पडलेल्या एका अल्लड प्रेमिकेचे मन  & लग्नानंतर काही वर्षांनी संसारात तृप्त होऊनही पुन्हा नव्याने तिच्या
प्रेमात पडलेल्या नवऱ्याचे मनोगत



नव्याने प्रेमात पडलेल्या एका अल्लड प्रेमिकेचे मन -----


सख्या कसे सांग तुला------
सख्या,कसे सांग तुला,
कळतील माझ्या मनीच्या भावना,
चोरट्या कटाक्षासाठी
उगा तू खाऊ नकोस भाव ना .


तू मनमीत, तू चितचोर,
तूच माझा प्रियतम साजना ,
तन-मन सारे अर्पिले तूज
तुझे प्रेमच माझा साज ना .


सख्या कसे सांग तुला,
भेटू कुठे कसे रे राजसा,
हलकासा हवाहवासा
स्पर्श वाटे मनास राज सा .


मोगरा-मदनबाणाच्या
सुगंधावर जसा माझा भरवसा,
वासनेवीन प्रेमाच्या
तृप्ततेने तसा माझा भर वसा.


स्मिता साळवी


लग्नानंतर काही वर्षांनी संसारात तृप्त होऊनही पुन्हा नव्याने तिच्या
प्रेमात पडलेल्या नवऱ्याचे मनोगत ------
सखे कसे सांग तुला-----
प्रिय सखे, कसे सांग तुला,
पूर्वीचे ते दिन स्मरतील ?
जग-रहाटि सोडून सारी
पुन्हा प्रेमाने हृदये भरतील?


चोरट्या कटाक्षातील जादू
रोखल्या नजरेत भरशील का?
धुंद स्पर्शातला शहारा
घट्ट कवेत बहरशील का?


प्रिय सखे,कसे सांग तुला
एकांतात कुठे गाठू?
श्वासातला मदमस्त गंध
रोमरोमांत लागे दाटू .


आई, सून, वहिनी, काकी
साऱ्या नात्यांची राखली बूज,
सखे कसे सांग तुला
कळते शब्दाविना माझे हितगूज.


स्मिता साळवी