असं कोणीतरी भेटावं

Started by Sneha Mohan Jadhav, November 04, 2015, 12:41:30 PM

Previous topic - Next topic

Sneha Mohan Jadhav

असं कोणीतरी भेटावं

वास्तवा पलिकडे ही एक जग असावं
पाहिलेलं प्रत्येक स्वप्न जिथे खरं व्हावं
तिथे कोणीतरी असं भेटावं
ज्याच्या सहवासात 'मी ' असण्यात समाधान वाटावं

प्रत्येक आनंद साजरा करण्यासाठी त्याने बरोबर असावं
झालंच कधी दुखः तर त्याने समजावून सांगावं

ज्याच्या सोबत वेळेचं भान विसरून जावं
अन ज्याच्या बरोबरचा प्रत्येक क्षण अमुल्य आठवणीची ठेव असावी

ज्याच्याबरोबर कल्पनांचे पंख लावून भुर्र उडून जावं
ज्याच्या समवेत भोवताल स्वर्गवत भासावं

वाटलं कधी हारल्यासारखा तर त्याच्या दिलास्याने जिंकावं
स्तब्ध झाले असताना पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन मिळावं

स्वतःचे दुखः लपवून ज्याचे दुखः हलके करावेसे वाटावे
घडले काहीही तरीही त्याच्यासाठी जगावेसे वाटावे

दैनंदिन जीवनातील चढ उतार ज्याच्या सोबत क्षुल्लक वाटावेत
शब्दांची साथ नसताना ज्याला हृदयातील भाव कळावेत

असं कोणीतरी भेटावं
असं कोणीतरी भेटावं

वास्तवा पलिकडे ही एक जग असावं
पाहिलेलं प्रत्येक स्वप्न जिथे खरं व्हावं
तिथे कोणीतरी असं भेटावं
ज्याच्या सहवासात 'मी ' असण्यात समाधान वाटावं

-स्नेहा जाधव