फितूर चांदणे

Started by Parshuram Sondge, November 05, 2015, 11:40:30 PM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

फितूर चांदणे

थंड गारा धूंद वारा वाहे
चांदण्याचा अंगी शाल रे
स्पर्श तुझा श्वास माझा
ढळलेला तुझा कसा  तोल रे

शहारते अंग अंग सख्या
रात राणी बहरास आली
सैल कर थोडी मिठ्ठी तुझी
का थांबली ती सदाफुली

सोडू नकोस केस मोकळे
चांदणे ही आज फितूर झाले
बहरे निशीगंध कसा भाबडा
तुझे इरादे सांग  त्याला कसे कळाले ?
. . .  परशुराम सोंडगे
9422 076739



Pprshu1312