ते आई बाप असतात

Started by Vikas Vilas Deo, November 06, 2015, 07:05:47 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

आभाळ फाटलेले असतांना
स्वत पावसात भिजून
छत्री बाळाच्या डोक्यावर धरतात
   ते आई-बाप असतात

कडक्याच्या थंडीत गोठणार्‍या हिवाळ्यात
बाळाला शालीत गुंडाळून
स्वत: रात्रभर कुडकुडतात
   ते आई-बाप असतात

कडक उन्हाळ्यात घसा कोरडा झाला असतांना
स्वत: घोटभर पाणी पिऊन
बाळाला तृप्त करतात
   ते आई-बाप असतात

अंगवरील साडी जुनी झाली असतांना
अन अंगरखा फाटलेला असतांनाही
बाळाला नवी कापडा घेतात
   ते आई-बाप असतात

चतकोर भाकर अन पोटभर पाणी पिऊन
तृप्तिची ढेकर देऊन
बाळाला पोटभर खायला देतात
   ते आई-बाप असतात

चरणाचे अमृत पिऊनही अन
हजार जन्म घेऊनही
ज्यांचे उपकार फेडता येत नसतात
   ते आई-बाप असतात