अनोळखी

Started by गणेश म. तायडे, November 06, 2015, 07:52:41 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे


गर्दीत होती ती अनोळखी
तिच्या शोधात माझी नजर होती
सैरभैर नजर माझी
तिच्यावरच टिकून होती
येता जाता लोक मला
धक्के बुक्के मारत होती
हटत नव्हती नजर माझी
एवढी ती सुंदर होती
घाबरलेली होती ती
याची मला जाणीव होती
हरिणीचे डोळे तिचे
गर्दीत काही शोधत होती
नजर पडताच माझ्यावर
गालातल्या गालात हसत होती
मला पाहून ती हसली
जणु गर्दीत मलाच शोधत होती
गर्दीत हात वर करुन
मला जवळ बोलवत होती
जवळ तिच्या जाताना
मनात गडबड सुरू होती
जवळ तिच्या गेल्यावर
ती कुणास तरी बोलवत होती
मागे वळून पाहिले तर
तिच्या नवऱ्याला ती शोधत होती
पाणी पाणी झाले अंगाचे
पाऊले परतीची पडत होती
मनातली सारी योजना
क्षणात पायदळी आली होती
पाहिले तिला वळून एकदा
हात पकडून नवऱ्याचा
दूर ती जात होती...
दूर ती जात होती...

- गणेश म. तायडे
    खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com

Jawahar Doshi


गणेश म. तायडे