रंगात मिसळताना

Started by सागर बिसेन, November 07, 2015, 10:09:51 AM

Previous topic - Next topic

सागर बिसेन

रंगात रंग मिसळले असे ,
शोध नव्या रंगाचा लागताना।
फिके वाटती तरी सारे,
हे रंग कुणी नसताना ॥

सोबत जणांची, साज नात्याची,
या सार्या रंगांतूनी जपताना।
मनी आले आनंद भरून,
पुन्हा छवी हास्याच्या छापताना॥

रंगात क्षण काही असावे,
अचानकच आठवण करून देताना।
त्या क्षणांची गाठ बांधूनी,
नयनी अश्रू नवे दाटताना॥

कधी दाट, कधी फिकट,
असावे रंग आयुष्य रेखाटताना।
नक्कीच व्हावे रंगीत कधीतरी,
मनी आशा हीच बाळगताना॥

विचारही न आला लिहीता,
हे काव्य रंगास संबोधताना।
उपमेची ही दुनिया सारी,
मी रंग नात्यांत जडताना॥

:- सागर बिसेन
9403824566