गावातील दिवाळी

Started by सागर बिसेन, November 07, 2015, 10:33:39 AM

Previous topic - Next topic

सागर बिसेन

गावातील दिवाळी

चित्रच वेगळे असते गावाचे,
इथे साजर्या होणार्या सणासुदीचे।
दूरच राहिली ती चकमकीची व्याख्या,
निरखून पहा इथे जगणे लोकांचे॥

न गवगवा इथे, न दिखावा काही,
जरी असली दिवाळीची घाई।
शहरांसारखी नसे धावपळ इथे ,
चाले दिवाळीच्या आदल्या दिनपर्यंत साफसफाई।।

बाळगूनी काळजी तरी सर्व कामांची,
सणातही नसे कुणा रजा शेताची।
भरूनीया आधी पोटाची खळगी,
सांजवेळी तव किंमत कळे या घामाची॥

नांदते दुसरीकडे जनता, खोट्या नादात दिवाळीच्या,
बाता होती इकडे तिकडे खरेदीच्या।
गावातही होतसे हे काही थोडेफार,
मात्र नसताते लावलेली त्यास लेबल शाॅपिंगच्या॥

कुणास भेटती फटाके, कुणाच्या नशीबीही नाही,
तरीही इच्छेस पुर्ण करती बापआई।
थोडक्यातच का होईना मात्र इथे,
हिच दिवाळीची असे खरी नवलाई॥

नसे कुणास इथे कामापासुन रजा,
सगळीकडे तरी आता फक्त दुःखवजा।
असोे कितीही जरी रोशनाई शहरात,
गावातच दिवाळीची असे खरी मजा॥

:- सागर बिसेन
9403824566