हातावर तुरी

Started by शिवाजी सांगळे, November 08, 2015, 07:19:49 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

हातावर तुरी..

प्रत्येक जण हेच म्हणतो
पहा आमचीच गोष्ट खरी,
कितीही होउ देत खर्च
आम्हीच देउ स्वस्त तुरी!

जागोजागी मारून छापे
पकडून झाले हो साठे!
लोकांच्या हाती नाही आली
तुरडाळ दडविलित हो कोठे?

पक्षा पक्षांतर्गत डाळीयान
प्रायोजित तुमची होशियारी,
कृषी प्रधान असुन आम्ही
लपविली तुरी न् बोंबा मारी!

बाजारात कि हो तुरी न्
भट भटणीला तो मारी,
गेली म्हणं झाली जुनी
उरली ती नेत्यांची हेराफेरी!

© शिवाजी सांगळे🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९