वास्तवाचे काटे

Started by Csushant, November 08, 2015, 09:25:45 AM

Previous topic - Next topic

Csushant

पहाटेची थंडी गुलाबी,
मनात आले भटकून यावे स्वप्नांच्या देशी!
त्या तिथे रम्यलोकी,
द्रुष्टीस भिडली स्वप्नलोकीची राजकुमारी!
लावण्य तिचे जणू उमलती कळी,
तरल इतकी की जलधारेच्या रंग-गंधानेही मोहरून जाई!
मनात आले पुसावे तिला येशील का माझ्या देशी,
पण इतक्यात डोक्यात एकच वीज चमकली,
अन् उमगून आले,
स्वप्नातल्या कळ्यांना स्वप्नातच राहू दे,
का त्या कोवळ्या जीवाला रुतावे वास्तवाचे काटे!!!