साथीदार

Started by गणेश म. तायडे, November 10, 2015, 09:23:06 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे


लकझकत्या ताऱ्यांत
चेहरा एक शोधतोय
चंद्रापरी सुंदर असा
साथीदार मी शोधतोय...
चांदण्यांचा मोती हार
जिच्या गळ्यात शोभतोय
असा एक साथीदार
स्वप्नात मी पाहतोय...
भिरभिरत्या वाऱ्यात
सुगंध जिचा वाहतोय
अलगद स्पर्श होता जिचा
शहारा मनी उठतोय...
मनाचा हा काजवा
ठिणगी घेवुनी उडतोय
असा एक साथीदार
मनाच्या गाभाऱ्यात शोधतोय...
मनाचे कोडे माझ्या
प्रेमानेच उलगडतोय
साथीदाराच्या शोधात
रेशीमबंध मनी बांधतोय...
असा एक साथीदार
मनाच्या गाभाऱ्यात शोधतोय...
चंद्रापरी सुंदर असा
साथीदार मी शोधतोय...

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com