हरवलेलं हृदय... विस्कटलेल प्रेम...

Started by shetye_pranav, November 11, 2015, 03:00:44 PM

Previous topic - Next topic

shetye_pranav

शिंपडून आनंदी पाणी प्रेमाच्या नाजूक पाकळ्यांवर,
दडलेले शब्द हृदयातील अलगद आले ओठांवर,
आसरा या शब्दांचा सौम्य तुझ्या बांध्यावर,
क्षणात हरपून गेलो समोर तुला पाहिल्यावर.

रुक्ष या धरतीवर बांधले प्रेमाचे अंगण,
बंधाच्या रेषांनी आखले एक अतूट रिंगण,
खऱ्या प्रेमाच्या अंगणाला मात्र काट्यांचे कुंपण,
पंचायत दोघांची संपेना, खूप ती विलक्षण.

नात्यात या दोघेही एकमेकांचे मितवा,
प्रश्न तरी टोचतो कि आपला नंबर कितवा?
वितळत्या मेणाच्या घराला, संशयाची मोठी झळ,
शुभ्र प्रेमाच्या कपड्यास स्पर्शला अविश्वासाचा मळ.

हळव्या जीवाला बिकट भावनांची जोड,
फसव्या खेळात झाली थोडी मोड-तोड,
नको त्या वेळी काढली कोणी हि खोड,
तुझ्याशिवाय साखर हि लागत नाही गोड.

प्रेमाच्या बाणाचा चुकला थोडा नेम,
सोडून तिला एकटा मिळवाया गेलो फेम,
अखेर होतो नात्यातील विश्वासाचा जाम मोठा गेम,
शोधत राहतो आपण, हरवलेलं "हृदय" अन विस्कटलेल "प्रेम"...