मनात आहे सांगायचे पण

Started by sameer3971, November 14, 2015, 01:10:42 PM

Previous topic - Next topic

sameer3971

मनात आहे सांगायचे पण
मनात वाटते भीती मजला
उगाच तुट्तील धागे आपुले
उगाच वेगळ्या होतील वाटा

खूप आहे दाटलेले अन
मनात आहे खूप साठलेले
उगाच डोळ्यातून छलकले
उगीचे आहे सल ते ओले

कधी विचारी मी मलाच
का रे? हा अबोला आहे
मोकळे पणाची ती मैफिल
कुठे रे? आज हरवली आहे

वाटले बाहूत मोकळे आज व्हावे
मोजकेच पण क्षणी आतुर असावे
झोकणे नकोच; पण ओतून मी रहावे
श्वासात माझ्या फक्त वाहनेच असावे

एकांत हा वाटतो जीवघेणा
उकांत पण आहे निशब्द सारा
भेटलेल्या त्या कैक क्षणांचा
आठवांचा फक्त कैफ तो उरला

जुळलेल्या जाणीवांचे भावनांचे
उसवलेल्या नात्यांचे गुंतण्याचे
उगाच तुटतील धागे आपुले
घटकेच उरात भीती ही दाटते

समीर..
मालाड, मुंबई.

Madhavi Chikhale