शोक गीत

Started by MURALIDHARSHIRSATH, November 16, 2015, 07:10:07 PM

Previous topic - Next topic

MURALIDHARSHIRSATH

शोक गीत

पृथ्वी पुत्र तू सहोदर रवीचा
प्रकाश देऊनी आम्हा ज्ञानाचा
प्राण सोडीला तिच्या मांडीवरती
पाहिला का? कुणी
तारका तुटल्या नभातुनी
भीमा रे तुझिया मृत्युदिनी ||
मृत्यू उभा तो जन्मापाठी
आकस्मित कशी घाली मिठी
अपशकून हा घडे आजला
धक्का बसला मनी ||
ओढून नेले तुज काळाने
दलित झाले उदासवाणे
जीव मात्रांना खेद वाटला
झाली दुनिया सुनी ||
ज्ञानाचे दुध आम्हा पाजुनी
बाळसे तूच दिधले जीवनी
अपर प्रीती आम्हावरती
आम्ही तुझे रे ऋणी ||
शव यात्रा ती तुझी पाहुनी
सागर आला पुढे धाऊनी
चरण स्पर्शिले तव लाटांनी
लाजविला अग्नी
दिन दुबळ्यांचा पाठीराखा ||
आज जाहला आम्हा पारखा
वाट पाही मुरलीधर हा
येशील का ? परतुनी ||
   
मु. ग. शिरसाठ   
  ९२७०१२७७६७