मायेचे छत

Started by rudra1305, November 17, 2015, 01:33:07 PM

Previous topic - Next topic

rudra1305

मायेचे छत
===========
छत करी घराचा विचार..
घराला मात्र भिंती चार..
प्रत्येकाचे निराळे आचार..
निराळेच त्यांचे तर्क विचार..!! छत मात्र असते एक..
बांधून ठेवते भिंती चार..
जसा लेकरांस मायेचा आधार..
रक्षण करी ते ऋतू चार..!!
चार दिशेला चार तोंडे..
भिंती सांधतात फ़क्त कोपर्यात..
छत्र सर्वास सांधून धरते..
विशाल जागा त्याच्या हृदयात..!!
अशीच असतात हो माणसे..
चार भिंतीच्या घरात..
मशगूल स्वहित जपण्यात..
अन उपकार छताचे विसरतात..!!
टूटता छप्पर कधी अचानक
रंग ठरतात सारे भिंतीचे..
पडता घाव उन्ह पावासाते..
उपकार आठवतात मग छताचे..!!
विनवीतो चकोर सकल जनांस..
छत असते खरा आधार..
नका विसरू हो कधी त्यास..
समजू नका त्या छतास भार..!!
****सुनिल पवार.....