आपले मराठी लोक मागे का ?

Started by dhanaji, November 18, 2015, 11:52:54 AM

Previous topic - Next topic

dhanaji


प्रत्येक मराठी माणसाने वाचलेच पाहिजे
आपले मराठी लोक मागे का ?
एका उंच डोंगरावर एका गुहेत शंभर करोड रुपयांची संपत्ति असते. पण त्या संपत्तीमधून एक माणूस फक्त एकदाच एक करोड रुपये घेऊन जाऊ शकतो. पुन्हा त्याला पैसे घेता येणार नाही अशी अट असते. ही गोष्ट जवळील गावच्या तीन गरीब लोकांना (मराठी, गुजराथी, भैया). यांना समजते. ते तिथे जाऊन एक एक करोड घेऊन येतात.भैया ते पैसे आपल्या परिवारासाठी आपल्या बांधवासाठी खर्च करतो.मराठी माणूस पैसे घेऊन घरी येतो गुपचुप कोणालाही थांगपत्ता न लागू देता आपल्या बायको आणि मुलाला घेऊन आपल्या गरीब भाऊबहिण आई वडिलांना सोडून शहरात निघून जातो. गुजराती माणूस पैसे घेऊन घरी येतो आणि आपल्या परिवारातील व्यक्तींना त्या गुहेचा पत्ता देतो आणि जेव्हा त्याचे परिवार पैसे घेऊन येतात त्यानंतर तो आपल्या जातबांधवाना त्या गुहेचा पत्ता देतो आणि अट घालतो की प्रत्येकी २५ लाख मला द्यावे लागतील. अशा प्रकारे तो स्वतः श्रीमंत होतो आणि आपल्या बांधवांना पण श्रीमंत बनवतो. परंतु आपला मराठी माणूस संपत्ती आल्यावर आपल्या सख्ख्या व चुलत भावाबहिणीचा, आई वडिलांचा विचार करत नाही. फक्त स्वतःचाच विचार करतो. जर अशी विचार करणारी माणसे आपल्या समाजात असतील तर मराठी माणूस कसा मोठा होणार ? तुम्ही पाहाल तर कोणत्याही शहराच्या चौकाचौकात राजस्थानी लोकांची विविध प्रकारची दुकाने दिसतात, कशामुळे ? तर राजस्थानी लोकं आपल्या लोकांना दुकाने चालु
करण्यासाठी सगळ्या प्रकारची मदत करतात किंवा आपल्या दुकानात लागणार्‍या वस्तूंचे छोटे मोठे कारखाने काढावयास मदत करतात. म्हणूनच सर्व क्षेत्रात आज राजस्थानी लोकांचं वर्चस्व दिसते.मराठी माणसं मात्र आपण आपल्या माणसाला मदत केली आणि तो आपल्या पेक्षा मोठा झाला तर ... या भावनेने मदत तर सोडा पण त्याचे सर्व मार्ग बंद करू पहातात. माझ्या समाजात मीच मोठा राहिलो पाहिजे या विचाराने दुसर्‍याला खाली दाबतो.अशी स्वार्थी माणसे खूप आहेत ज्यांच्यामुळे मराठी पाऊल मागे पडत आहे. मराठी माणसाला आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे.तरच मराठी पाऊल पडते पुढे हे स्वप्न साकार होईल.


पटलं तुम्हाला तर प्रत्येक
मराठी माणसाकडे पाठवा.