चर चर...

Started by Siddhesh Baji, December 15, 2009, 09:34:29 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

ढमढेरे गुरुजी : आत्ताच तुम्हाला मी वनचर, भूचर, जलचर आणि निशाचर हा धडा शिकवलाय. कळळा का सगळ्यांना?

बंडू : हो गुरुजी.

ढमढेरे गुरुजी : अरे वा बंड्या. बरं, पाण्यातही राहू शकतो, जमिनीतही राहू शकतो अशा एखाद्या प्राण्याचं नावं तूच सांग पाहू.

बंडू : बेडूक!

ढमढेरे गुरुजी : शाब्बास. आता अजून अशा चार प्राण्यांची उदाहरणं दे पाहू.

बंडू : सोप्पाय.. बेडकाची आई, बेडकाचे बाबा, बेडकाचा भाऊ आणि बेडकाची आजी.