माफ करशील मला.??

Started by sindu.sonwane, November 20, 2015, 05:42:00 PM

Previous topic - Next topic

sindu.sonwane

 माफ करशील मला.??

कधी तरी तुलाही कळेल
माझ तुझ्यापासून दूर जाणं
माझ्यासाठीही नव्हत ते सहज शक्य,
कधीतरी एकांतात जेव्हा तू राहाशील
अलगद वाऱ्याच्या स्पर्शाने विचलित होशील
डोळ्यांचे काट भरून येतील अन तू न राहूनही
माझ्या आठवणीत गुंतशील,
इतक्यात मला समजन तुला शक्य नाही

तुझ्याच भल्यासाठी मला तुला सोडाव लागलं
याहून मोठ दुर्भाग्य अजून काही नाही
चांगल राहून तुझ्यापासून वेगळ होण शक्य नव्हत
म्हणूनच मला तुला अस छळाव लागल
माझ्या तोंडातून निघालेलं प्रत्येक कटोर शब्द तुझ्यासाठी नव्हतच रे,
प्रत्येक शब्द उलटपक्षी माझ्या काळजाला कपात गेल
आयुष्यभर तुझ्याशिवाय जगण
याहून मोठी शिक्षा अजून काय असेल
जिच्या आयुष्यात तू
आणि सर्वत्वपारी फक्त तूच जिच जीवन होतस
प्रत्येक श्वासासह तूच हृदयात धडधडत होतास
माझ्या मनावर तुझच अधिराज्य होत,
तुझा आणि तुझा च सहवास माझ्या अंतरंगात होता
चूक तर माझी झालीच रे, का कोण जाने?
तुझ्या सहवासात माझ्यातला कमीपणा विसरली
अन न राहूनही तुझ्यावर प्रेम करत गेली
सर्वार्थाने मी फक्त तुझीच होत गेली
कळतंय रे मलाही तुझ्या मनाची तळमळ,
खरच स्वार्था साठीच जगली मी, आज खरोखरच स्वार्थी ठरली मी
माफ करशील मला
नाही राहू शकत आयष्य भर तुझ्यासोबतिला
कधी कुठे जीवनाची डोर माझी तुटेल , नाहीरे तुला सांगू शकत,
तुझ्या प्रत्येक सुखावर ,माझ्या कमीपणाच विरंजन पडेल,
तुला मला वेगळ करण तर
त्या परमेश्वरालाही जमलं नसत
म्हणूनच कि काय........
मला अस त्याने घडवलं
जन्म माणसाच देऊनही,एक अधुरपण सोबतीला दिल
नेहेमीच्या एकांतवासात
नाही तुला ठेवायचंय मला
खरच प्रेम केलंय तुझ्यावर
आणि म्हणूनच तुझ जीवन मला फुलवायचं
खूप नशीबवान असेल ती
जिच्या हातात तुझा हात असेल
अवतीभवती तुझ्या सुखाची मांदियाळ असेल,
नशीब जरी माझं नव्हतच कधी
तरी एक मात्र नक्कीच होत रे
तुला हे खोट हि वाटेल पण
जीवाच्या आकांताने सांगते रे
माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे,
आणि शेवटी
फक्त आणि फक्त तुझ्यावरच ते राहणार आहे
अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत
कधी तरी करशील का रे मला तू माफ.............. ??? ???                        
                                                      सिंदू