स्वागत मनु तुझे...

Started by sanjay limbaji bansode, November 20, 2015, 07:01:30 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

स्वागत मनु तुझे .....स्वागत.
पुन्हां या भारतभूमीवर,
तुझे सुस्वागत.

आमच्या महापुरुषानी तुला जमिनीत गाडण्याचा अतोनात प्रयत्न केला !
पण, त्यांच्या भरकटलेल्या अनुयायामूळे,
नव्हे !
हे अनुयायी कसले ?
त्यांच्या आंधळ्या भक्तामुळे,
आज पुन्हां तु वर येऊन या भारतभूमीवर,
तुझी जुलमी चातुर्वर्णी सत्ता  भारतमातेच्या पदरात टाकण्या यशस्वी होत आहेस.

कालही जीत तुझीच होती.
आणि, आजही जीत तुझीच आहे.
कारण,
तु दिलेला चातुर्वर्ण हजारो वर्षापासून आमच्या DNA ला गोचिडावानी चिटकून,
आतपर्यंत आम्ही सोबतच बाळगला.

हजारोवर्षापासून आमच्या DNA ला चिटकलेला तुझा तो चातुर्वर्णाचा गोचिड आज इतका मोठा झाला की,
आमच्या शरीरातले त्यांनी सारे रक्त पिऊन घेतले.
त्यामुळे आम्हांला तो आमच्या रक्ताचाच,
म्हणजे आमचाच वाटू लागला.

इतके वर्ष तो गोचिड गप्प होता. पण,
आता मात्र त्यानी त्याची जात दाखवायला सुरवात केली.
तो आता माणसासारख्या माणसाला जनावर बनवण्याच्या प्रयत्नात आहे.

आम्हांला आमच्या महामानवाने दिलेले अधिकार हळूहळू काढून तो त्यांना पुन्हां शूद्र बनवण्याच्या प्रयत्नात आहे.

आम्ही मात्र गप्प आहोत.
कारण,
आम्हांला तर तो आमचाच  वाटतो !

संजय बनसोडे -9819444028