उडत्या पाखरा

Started by sanjay limbaji bansode, November 20, 2015, 07:06:25 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

ना पर्वा दुःखाची, तूच दिशा ऐशाची
उडत्या पाखरा...तुला भीती कशाची !!

बघ शहरे ते बघ गावे
कर सारी दुनिया,  तुझ्या नावे
वस्त्रे परिधान कर, नव्या वेषाची
उडत्या पाखरा...तुला भीती कशाची !!

अंधार भयानं जरी आले तूफ़ानं
उडतच रहा,  तू दाही दिशानं
सोड कालचे, कर पर्वा उद्याची
उडत्या पाखरा...तुला भीती कशाची !!

बघेल सारी दुनिया, कर नवनवी किमया
नको होऊ बंदिस्त, घाबरुन कुणाच्या भया,
उडतच रहा, तुला साथ संजयाची
उडत्या पाखरा...तुला भीती कशाची !!

संजय बनसोडे -9819444028

suraj choudhari

khup chan aahe kavita tumchi . Nice poem. Asyach khup motivational kavita lihat raha v kavitechya duniyet pakhrasarkhe unch udat raha. ...... Jay bhim & namo buddhay.....!


vishal patil