तुलाच शोधतो आहे.......

Started by snoky, November 20, 2015, 11:13:10 PM

Previous topic - Next topic

snoky

दाटुन आला अंधार जरी......तुझ्या असण्याचा आभास आहे......
संपत आहे वात दिव्यातली जरी.....तुझ्या आठवणींची आस आहे......

सरीं पावसाच्या मंदावल्या जरी......अश्रूंचे अोघ डोळ्यांत आहे......
मेघ गर्जना थांबल्या जरी......मन माझे अशांत आहे......

अंधारात डोळे माझे बंद जरी....... मी  शुंन्यात पाहतो आहे......
हरवले नाही काही जरी.....हरक्षणी तुलाच शोधतो आहे.......तुलाच शोधतो आहे.......

_निखिल सोनुने